Belagavi

राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या वेदा खानोलकरला रौप्य पदक

Share

दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावची जलतरणपटू वेदा खानोलकर हिने ४x१०० मीटर मिडले रिले प्रकारात रौप्यपदक पटकावत कर्नाटक राज्याचा गौरव वाढवला.

दिल्ली येथील तालकटोरा आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात १२ ते १७ डिसेंबरदरम्यान ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत बेळगाव येथील आबा हिंद स्पोर्ट्स क्लबची जलतरणपटू आणि जी. जी. चिटणीस स्कूलची विद्यार्थिनी कुमारी वेदा वैभव खानोलकर हिने कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व केले. तिने ४x१०० मीटर मिडले रिले स्पर्धेत द्वितीय क्रमांकासह रौप्य पदक जिंकले.

कुमारी वेदा हिला शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट चंद्रहास अनवेकर, प्रिन्सिपल नवीना शेट्टीगार, क्रीडा शिक्षक धनाजी सर, आबा क्लबचे अध्यक्ष शीतल हुळभते, हिंदचे अध्यक्ष अरविंद संगोळी यांचे प्रोत्साहन लाभले आहे. तसेच, एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे.

Tags: