कोल्हापूर येथे पार पडलेल्या शोटोकान कराटे डू असोसिएशनच्या १३ व्या राष्ट्रीय पातळीवरील कराटे चषक स्पर्धेत बेळगावच्या डायनॅमिक शोटोकान कराटे-डू संस्थेच्या ५७ खेळाडूंनी १०४ पदके मिळवत जनरल विजेतेपद पटकावले.


या स्पर्धेत देशभरातील विविध भागांतून १५०० हून अधिक कराटेपटूंनी सहभाग घेतला होता. या राष्ट्रीय स्पर्धेत बेळगावच्या डायनॅमिक शोटोकान कराटे-डू संस्थेच्या ५७ कराटेपटूंनी भाग घेत विजय संपादन केला. या ५७ विद्यार्थ्यांनी काता आणि कुमिते या प्रकारांमध्ये एकूण ४५ सुवर्ण पदके, ३३ रौप्य पदके आणि २६ कांस्य पदके अशी १०४ पदके पटकावली. या घवघवीत यशामुळे ही संस्था पहिल्या जनरल विजेतेपदाची मानकरी ठरली. या यशाबद्दल संस्थेचा सत्कार समारंभ १४ डिसेंबर २०२५ रोजी कंग्राळी खुर्द येथे पार पडला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण मासेकर, सुकन्या पाटील आणि राजश्री पट्टनशेट्टी आदी उपस्थित होते.
या खेळाडूंना मल्लेश चौगुले, शिहान पाटील, मितेश निलजकर, करण पाटील, गायत्री सामजी, गौरव पाटील, आणि श्रेया मायान्ना यांचे मार्गदर्शन लाभले.


Recent Comments