Belagavi

बेळगाव एज्युकेशन सोसायटीचा शताब्दी सोहळा

Share

बेळगाव एज्युकेशन सोसायटीचा शताब्दी सोहळा २० ते २६ डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमात विविध व्याख्याते, आमदार, मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करतील, अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिली.

‘इन न्यूज’शी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव एज्युकेशन सोसायटी शताब्दी साजरी करत आहे. या सोसायटीच्या अंतर्गत १९२५ मध्ये बी. के. मॉडेल हायस्कूल, उषाताई गोगटे शाळा, घोटगे शाळा, एन. एस. पै शाळा यासह अनेक महाविद्यालये आहेत. २० ते २६ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या समारंभाला खासदार तेजस्वी सूर्या, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, खासदार जगदीश शेट्टर, मंत्री कृष्णा बायरेगौडा, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील, आसिफ सेठ, डॉ. गुरुराज करजगी, चित्रपट अभिनेते सचिन पिळगावकर, दिग्दर्शक नागतिहळ्ळी चंद्रशेखर, गिरीश ओक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी श्रीनिवास शिवणगी, सुधीर कुलकर्णी, कृष्णकुमार पै, शैलजा चाटे, एस. एन. जोशी, अरविंद गंगूर आणि अन्य सदस्य उपस्थित होते.

Tags: