Uncategorized

वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिकता स्वीकारणे हेच शिक्षणाचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

बसवण्णांच्या भूमीत अंधश्रद्धा पाळणे दुर्दैवी आहे. रूढी-परंपरा संपवून बंधुता, स्वातंत्र्य, समानता ही संविधानिक तत्त्वे पूर्णपणे लागू झाल्याशिवाय जातीय व्यवस्था व विषमता दूर होणार नाही. व्यक्तीच्या विकासासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे असे मत मुख्यमंत्री सिध्दरामय्यांनी व्यक्त केले.

ते आज चंदन एज्युकेशन सोसायटी, लक्ष्मेश्वर यांच्या वतीने आयोजित ‘भारतरत्न प्रो. सी.एन.आर. राव १० व्या वर्षीचा विज्ञान विस्तृतीकरण कार्यक्रम-२०२५’ आणि ‘२०२५ चा प्रतिष्ठित चंदन श्री पुरस्कार बी.एस. पाटील यांना प्रदान’ करण्यात आला. यावेळी आयोजित समारंभात बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व धर्म मानवता शिकवतात. परंतु, हितसंबंध जपणाऱ्या काही घटकांनी धर्माचा अर्थ चुकीच्या पद्धतीने घेतला आहे. अडचणीच्या काळात ‘हे आपले नशीब आहे’ असे म्हणून शांत न बसता, इच्छाशक्तीने परिश्रम घेतल्यास कोणताही वर्ग यश मिळवू शकतो. शिक्षण हे एका विशिष्ट वर्गापुरते मर्यादित नाही. प्रामाणिक प्रयत्न आणि संधींचा योग्य वापर करून उच्च स्थान गाठता येते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि वैचारिकता आत्मसात करणे हेच विज्ञानाचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

शाला स्वातंत्र्य मिळून ७९ वर्षे झाली, आपण ७६ टक्के साक्षरता गाठली असली तरी जातीयवाद संपलेला नाही. सुशिक्षित लोकांमध्येच जातीयता अधिक प्रमाणात दिसून येत असून, ती दूर व्हायला हवी, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले.

Tags: