Belagavi

बेळगावजवळ राजहंसगड येथे जनावरांच्या चाऱ्याला भीषण आग

Share

बेळगावजवळील राजहंसगड येथे आज दुपारी तीन वाजता जनावरांच्या चाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. गर्लगुंजी क्रॉस-नंदीहळ्ळी रोडवरील राजहंसगड येथे ही घटना घडली.

या आगीत कच्च्या भाताच्या दोन गंजी, पिंजरच्या दोन गंजी आणि करडची एक गंजी अशा एकूण जनावरांच्या चाऱ्याच्या पाच गंजी जळून खाक झाल्या. भाताच्या दोन गंजींची आज रात्री मळणी करण्याचे नियोजन होते. या दुर्घटनेत जवळपास ३० पोती भात आगीच्या भक्षस्थानी पडला.

राजहंसगड येथील शेतकरी प्रकाश रघुनाथ थोरवत यांचे या आगीत जवळपास दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जनावरांचा चारा जळाल्यामुळे त्यांच्या जनावरांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांच्या व शेजारील नागरिकांच्या सतर्कतेमुळे शेजारील करडाच्या चाऱ्याच्या गंजींचे आगीपासून संरक्षण झाले.

या शेतकऱ्याच्या घरी चारा खाणाऱ्या तीन म्हशी असल्याने, सरकारने सामाजिक बांधिलकी म्हणून तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.

Tags: