धारवाड शहरातील एका दुचाकीमध्ये लपलेल्या नागिण पिलाला वाचवण्यात सर्पमित्र मंजुनाथ यांना यश आले आहे.

धारवाडमधील कल्याण नगर येथील एका रहिवाशाच्या अॅक्टिवा दुचाकीमध्ये हे नागिणीचे पिलू लपून बसले होते. दुपारी ही अॅक्टिवा स्कुटी घेऊन येत असताना त्यामध्ये त्यांना विचित्र हालचाल जाणवली. दरम्यान स्कुटीमध्ये नागिणीचे पिल्लू लपल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने दुचाकी धारकाने सर्पमित्र मंजुनाथ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच मंजुनाथ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अॅक्टिवाचे कव्हर उघडून आतमध्ये असलेल्या नागिणीच्या पिलाची सुखरूप सुटका केली व त्याला जंगलात सोडून दिले


Recent Comments