Belagavi

काँग्रेस सरकारकडून इडीगा समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष : ऋषिकुमार स्वामीजी

Share

राज्य सरकारमधील काँग्रेस पक्षाने इडीगा समाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. सामाजिक न्याय आणि समानतेच्या ज्या मूल्यांवर आधारित हे सरकार सत्तेवर आले, ती मूल्ये आता सरकारने गमावली आहेत, अशी तीव्र टीका इडीगा समुदायाचे स्वामीजी ऋषिकुमार यांनी केली.

गुरुवारी बेळगाव येथे ते पत्रकारांशी बोलत होते. आमच्या समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती, त्यासाठी मी येथे आलो आहे. मागासलेल्या समाजाबद्दल बोलणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कोणत्याही प्रकारचा न्याय दिला नाही. अल्पसंख्याक म्हणजे केवळ जमीर अहमद अहमद आणि तन्वीर सेठ नव्हेत. सरकार फक्त याच नेत्यांना विश्वासात घेत आहे, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री केले पाहिजे. पक्ष संकटात असताना ज्या व्यक्तीने काम केले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

Tags: