बेळगाव सुवर्णसौधच्या सभागृहात धारवाड उत्तरचे आमदार प्रसाद अब्बय्या यांनी आमच्या वार्ताहराशी बोलताना अधिवेशनाच्या कामकाजावर तीव्र आक्षेप घेतला आहे. अधिवेशन काळात उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा होत असताना विरोधी पक्षाचे सदस्य केवळ विषयांतर करून वेळ वाया घालवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

म्हादई सिंचन योजना, कृष्णा आणि घटप्रभा उपसा सिंचन योजना रखडण्यामागे केंद्राच्या वन विभागाची परवानगी आणि शेजारील राज्यांचा विरोध ही प्रमुख कारणे आहेत. या सर्व बाबींमध्ये केंद्र सरकारने मध्यस्थी करून प्रकल्पांच्या कामांना तात्काळ मंजुरी द्यावी. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या संदर्भात केंद्राचे लक्ष वेधले पाहिजे. या भागातील ज्वलंत समस्या असलेल्या सिंचन योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे. हे सोडून ते सभागृहात वेळ वाया घालवत आहेत, असा आरोप आमदार अब्बय्या यांनी केला.


Recent Comments