Belagavi

बेळगावात सभापती यू. टी. खादर यांनी खेळला गोट्यांचा खेळ

Share

हे सर्व मान्यवर सभापती, मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनी आज सकाळी लवकर ‘गोट्यांचा खेळ’ आणि ‘गिल्ली-दांडू’ खेळून लोकांचे लक्ष वेधले. विधानसभेत काम करणारे लोक असे बालपणीचे खेळ का खेळत आहेत?’ असा विचार तुम्हाला येत असेल तर, हा विशेष रिपोर्ट तुम्ही नक्क्की पहा…

विधानसभेत कामकाज पाहणारे सभापती, विविध विषयांवर जनसामान्यांचा आवाज मांडणारे आमदार, या सर्वांनी आज सकाळी लवकर गोट्या खेळत आणि गिल्ली-दांडू खेळत लोकांचे लक्ष वेधले. ही सर्व दृश्ये बेळगाव मध्ये पाहायला मिळाली. निमित्त होते ते बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या बालपणीच्या खेळांच्या उपक्रमाचे.. गेली दहा वर्षे ‘विसरलेल्या बालपणीच्या खेळांची’ लोकांना पुन्हा ओळख करून देण्याच्या उद्देशाने या विशेष क्रीडा महोत्सवाचे आयोजन आमदार अभय पाटील यांनी केले होते.

यावेळी बोलताना सभापती यू. टी. खादर म्हणाले की, हे सर्व खेळ आपल्या पूर्वजांचे आहेत. आमदार अभय पाटील यांनी आजच्या पिढीतील मुलांना या लोककला/लोकक्रीडांची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. पूर्वजांचे हे खेळ मुलांना शिकवण्याचे काम झाले पाहिजे. सध्याची मुले केवळ मोबाईलला चिकटून एकाकी जीवन जगत आहेत. मात्र, हे लोक खेळ सामूहिकतेची भावना आणि खेळाडूवृत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. हे खेळ मुलांना शिकवण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.

यावेळी आमदार सिद्दू सवदी म्हणाले की, लहान असताना ‘गोट्यांचा खेळ’, ‘गिल्ली-दांडू’, ‘भिंगरी’, ‘सरबडगी’, ‘लगोरी’ हे सर्व खेळ आम्ही खेळायचो. लहानपणी मुलांना सुदृढ बनवण्यासाठी हे खेळ पूरक ठरत होते. हार-जीत ही सामान्य गोष्ट आहे. विजय साजरा करणे आणि पराभव स्वीकारणे हे खेळ शिकवतात. मात्र, दुर्दैवाने हल्लीची मुले मैदानी खेळ विसरून मोबाईलच्या व्यसनाधीन झाली आहेत. जर पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले, तर ते सुदृढ आरोग्य मिळवू शकतात.

आमदार अभय पाटील म्हणाले की, विसरल्या गेलेल्या बालपणीच्या खेळांची लोकांना पुन्हा आठवण करून देण्यासाठी आणि तरुणांमध्ये त्यांचा प्रचार करण्यासाठी गेल्या नऊ वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सुमारे ८० वर्षांपासून ते २० वर्षांपर्यंतचे लोक आज हे खेळ खेळत आहेत. प्रत्येक खेळामागे एक विज्ञान आहे. शरीराला योग्य अशी रचना या खेळांची होती. हे खेळ खेळून आपण सुदृढ राहू शकतो. बालपणीचे हे खेळ सामंजस्याचे प्रतीक आहेत. गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न ठेवता हे सर्व खेळ खेळता येतात. पालकांनी मोबाईलचे व्यसन कमी करून आपल्या मुलांना बालपणीचे खेळ शिकवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

Tags: