“आमचे हायकमांड पक्षश्रेष्ठी कमकुवत झालेले नाही. आमचे सर्व आमदार स्वतंत्र आहेत,” असे मत मंत्री सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले.

आज बेळगाव येथे मंत्री सतीश जारकीहोळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. मुख्यमंत्री बदलण्याबद्दल किंवा भावी मुख्यमंत्र्यांच्या घोषणांबद्दल सतत होत असलेल्या विधानांवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केले. “आमचे हायकमांड कमकुवत झालेले नाही. सर्व आमदार स्वतंत्र असल्यामुळेच असे बोलतात. मुख्यमंत्री बदलणार की नाही, हे आम्हाला माहीत नाही. मात्र, अशा वक्तव्यांमुळे नक्कीच पक्षात विसंगती निर्माण होत आहे. या विषयावर आम्ही चर्चा करणार आहोत,” असे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.


Recent Comments