Belagavi

बेळगावात गॅंगवाडी परिसरात घरात सिलेंडरचा भीषण स्फोट

Share

बेळगावच्या गॅंगवाडी भागात एका घरात अचानक सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बेळगाव शहरातील गॅंगवाडी परिसरात गुरुवारी स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची भयानक घटना समोर आली आहे. या स्फोटामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटात काही रहिवाशांना किरकोळ दुखापती झाल्याचे समजते. या घटनेची माहिती मिळताच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना योग्य उपचारांसाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

Tags: