Belagavi

अ. भा. रेल्वे मंडळ आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या केदारी पाटील यांना रौप्यपदक

Share

अखिल भारतीय रेल्वे मंडळाकडून आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचे सुपुत्र केदारी पाटील यांनी रौप्यपदक पटकावले आहे.

बेळगावच्या यमनापूर भागातील सुपुत्र केदार जयवंत पाटील यांनी अखिल भारतीय रेल्वे मंडळाच्या वतीने आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेच्या ६५ किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले आहे. यापूर्वी त्यांनी ज्युनियर मिस्टर इंडिया आणि कर्नाटक राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. सध्या केदार पाटील हुबळी रेल्वे विभागात सेवा बजावत आहेत.

Tags: