Belagavi

चिन्नस्वामी स्टेडियमवर लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा थरार!

Share

कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे नूतन अध्यक्ष व्यंकटेश प्रसाद यांनी घोषणा केली आहे की, बेंगळुरूमधील चिन्नस्वामी स्टेडियमवर लवकरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा सुरू होतील.

व्यंकटेश प्रसाद यांनी बुधवारी बेळगाव येथील कणबरगी क्रिकेट स्टेडियमची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी चिन्नस्वामी स्टेडियमची सद्यस्थिती आणि भविष्यातील योजना यावर भाष्य केले.

चिन्नस्वामी स्टेडियममध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने अंतिम सामना जिंकल्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय महिला विश्वचषकासह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा रद्द झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्टेडियमला आयकॉन मैदान बनवण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे.” तसेच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने येथे क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याबाबत तपशीलवार माहिती मागितली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Tags: