Belagavi

केंद्रामुळेच ऊस उत्पादक व साखर कारखाने संकटात; मंत्री संतोष लाड

Share

ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखाने यांच्या सद्यस्थितीला केंद्र सरकारची धोरणेच जबाबदार आहेत, असा आरोप कामगार मंत्री संतोष लाड यांनी केला आहे.

आज प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री संतोष लाड यांनी विधानसभेत विरोधकांना चर्चा करण्यासाठी पुरेस वेळ मिळत असून राजकारणावरच अधिक वेळ खर्च करणे योग्य नाही, असे मत व्यक्त केले. तसेच, त्यांनी भाजप नेत्यांवर केंद्राच्या आश्वासनांवरून जोरदार टीका केली. केंद्र सरकारच्या चुकीमुळेच ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदार अडचणीत आले आहेत, असे कामगार मंत्री संतोष लाड यांनी म्हटले.

विधन परिषद सदस्य सी. टी. रवी यांनी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत असल्याची केलेली टीका संतोष लाड यांनी फेटाळली. दहा वर्षांपूर्वी ‘या भूमीचा चौकीदार’ बनून काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन देणाऱ्यांनी आता योग्य माहिती द्यावी, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

मुख्यमंत्री खुर्चीच्या वादाबद्दल मला विचारून निराश होऊ नका, असे त्यांनी सांगितले. “सर्व काही शांत आहे. हा निर्णय पूर्णपणे हायकमांडवर अवलंबून आहे,” असे ते म्हणाले.

साखर मंत्री असताना संतोष लाड का बोलत आहेत, या आर. अशोक यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी केंद्राच्या धोरणावरच बोट ठेवले. “इथेनॉलचे उत्पादन वाढवायला सांगणारे केंद्र सरकारच कमी कोटा देत आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत, हे सत्य आहे. याबद्दल भाजप सदस्य विधानसभेत माहिती देत नाहीत. शेतकऱ्यांच्या संकटाला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे म्हणण्यात काहीही चूक नाही,” असे मत मंत्री संतोष लाड यांनी व्यक्त केले.

Tags: