Belagavi

आचार्य बाहुबली मुनी महाराजांच्या जयंती महोत्सवाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Share

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते आचार्य रत्न श्री १०८ बाहुबली मुनी महाराजांच्या ९४ व्या जयंती महोत्सवाचे आणि ‘सर्वदोष प्रायश्चित्त विधी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

 

बेळगाव मधील हलगा येथे श्री बालाचार्य सिद्धसेन मुनी महाराज अध्यात्मिक अनुसंधान फाउंडेशनच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिला आणि बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनीही या जयंती महोत्सवात सक्रिय सहभाग घेतला.

यावेळी व्यासपीठावर परमपूज्य वीरेंद्र हेगडे, परमपूज्य बालाचार्य डॉ. श्री १०८ सिद्धसेन महाराज, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, मंत्री डी. सुधाकर, आमदार आणि माजी मंत्री लक्ष्मण सवदी, आमदार कोनरेड्डी, सुरेंद्र हेगडे, विधान परिषद सदस्य नसीर अहमद, सुनील हनुमण्णवर, डॉ. मगदूम, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह जैन समाजाचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

Tags: