Belagavi

बिदर ते चामराज नगर रस्ता चौपदरी करण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव; मंत्री सतीश जारकीहोळी

Share

बिदर ते चामराज नगर या उत्तर-दक्षिण कर्नाटकला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विधान परिषदेत दिले.

विधान परिषद सदस्य शशिल नमोशी यांनी रस्त्यांची दुरवस्था आणि चौपदरीकरणाच्या कामातील दिरंगाईबद्दल सरकारला प्रश्न विचारत बिदर ते चामराज नगरला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे चौपदरीकरण करण्यावर भर दिला जावा अशी मागणी केली. कल्याण कर्नाटक चौपदरी रस्ता १०० कोटी रुपयांत करण्याचे सरकारने सांगितले होते, मग याची प्रगती का होत नाहीये?” असा प्रश्न त्यांनी केला.

यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तर दिले. “दोन पदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सर्वेक्षण करेल. १० हजारांहून अधिक वाहनांची वाहतूक होत असेल, तरच चौपदरी रस्ता बनवणे शक्य आहे. प्राधिकरणाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाईल. आम्ही यासंबंधी प्रस्ताव सादर करू आणि केंद्र सरकारच्या मंत्रालयाच्या निदर्शनास आणून देऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: