बेळगावसह बेळगाव मार्गाने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी उत्तर आणि दक्षिण भारतीय भोजनाची सेवा देण्यासाठी ‘संकपाळ कॅफे’ने आजपासून बेळगावात आपले कार्य सुरू केले आहे.


सुसज्ज इमारत आणि आत प्रवेश करताच डोळ्यांचे पारणे फेडणारी उत्तर तसेच दक्षिण भारतीय संस्कृती दर्शवणारी चित्रे… होय, हे दृश्य बेळगावात नुकतीच सेवा सुरू झालेल्या ‘संकपाळ कॅफे’मध्ये दिसले.

बेळगावच्या शिवबसव नगरजवळील मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत ‘संकपाळ कॅफे’ आजपासून सुरू झाला आहे. येथे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय थाळी तसेच विविध प्रकारचे पदार्थ एकाच छताखाली उपलब्ध आहेत. याशिवाय, वाढदिवस, किटी पार्टी आणि इतर पार्ट्यांसाठी हे एक योग्य ठिकाण आहे. आज नागनूर रुद्राक्षीमठाचे श्री अल्लमप्रभु स्वामीजी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात बसवराज महंतशेट्टी, सुभाष येणगी, अमर कोरे, बी.एस. गवीमठ, बसवराज जगजम्पी, राजेंद्र पै, सिंगाई, बावलत्ती, नरसन्नवर यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते ‘संकपाळ कॅफे’ला प्रारंभ करण्यात आला.

याबद्दल ‘संकपाळ कॅफे’च्या संचालिका निवेदिता संकपाळ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांनी नवीन सेवा सुरू केलेल्या ‘संकपाळ कॅफे’च्या मालकांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी ‘संकपाळ कॅफे’चे चंद्रकांत संकपाळ, नितीन संकपाळ, अनिल कट्टी यांच्यासह इतर लोक उपस्थित होते. तेव्हा, वाट कसली पाहताय? तुम्हीही आजच ‘संकपाळ कॅफे’ला भेट द्या.


Recent Comments