Belagavi

पाटील गल्लीतील ड्रेनेज ब्लॉकमुळे विहिरीचे पाणी दूषित

Share

बेळगावच्या प्रभाग क्रमांक ५० मध्ये ड्रेनेज तुंबल्यामुळे दूषित पाणी विहिरींच्या पाण्यात मिसळले आहे. यामुळे नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला असून, दोन दिवसांत समस्येवर कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

बेळगावच्या प्रभाग क्रमांक ५० अंतर्गत येणाऱ्या पाटील गल्ली आणि यरमाळ रस्त्यावर गटारांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ड्रेनेज ब्लॉक झाल्यामुळे सांडपाणी येथील विहिरींना मिळत असून, येथील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील विहिरीच्या पाण्याला विचित्र वास येत असून, माणूस तर सोडाच, जनावरेसुद्धा हे पाणी पीत नाहीत. अनेकदा महानगरपालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर कर्मचारी तात्पुरती दुरुस्ती करतात. परंतु, समस्या वारंवार उद्भवत असल्यामुळे पाणी वापरता येत नाही आणि लोकांमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.

संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी दोन दिवसांत या समस्येकडे लक्ष देऊन ती सोडवली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.

माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांच्या निदर्शनास ही समस्या आणून दिल्यावर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था केली असून, पाण्याची समस्या दूर केली आहे.

दोन दिवसांत संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन समस्या सोडवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.

Tags: