गोवंश संरक्षण कायद्यातील दुरुस्ती विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी हिंदू समर्थक संघटनांनी आज हुबळी शहरातील संगोळी रायण्णा चौकात तीव्र आंदोलन केले.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी या विधेयकात दुरुस्ती करून सरकार गोतस्करांना मदत करत असल्याचा आरोप केला. त्यांनी मागणी केली की, गोवंश संरक्षण विधेयक कोणत्याही बदलांशिवाय जैसे थे पुढे सुरू ठेवावे आणि केंद्र सरकारने गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित करावे.
आंदोलकांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या प्रतिमेचे दहन केले. त्यानंतर मिनी विधानसौधापर्यंत मोर्चा काढून राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आणि शहरातील तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर केले.
यावेळी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक, शिवानंद सत्तिगेरी यांच्यासह हिंदू समर्थक संघटनांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments