Belagavi

वर्षातून एकदा अधिवेशन घेतल्याने समस्या सुटणार नाहीत : एस. एल. भोजेगौडा

Share

वर्षातून एकदा सुवर्णसौधला रंगरंगोटी करून, आमदार आणि मंत्र्यांना बोलावून अधिवेशन घेतल्याने उत्तर कर्नाटकातील समस्यांवर तोडगा निघणार नाही, असे विधान परिषदेचे सदस्य एस. एल. भोजेगौडा यांनी केले.

उत्तर कर्नाटकातील समस्यांवर चर्चा होऊन त्या फलदायी व्हाव्यात, या उद्देशाने बेळगाव येथे सुवर्णसौध बांधण्यात आली आहे. बेंगळुरूमध्ये ज्याप्रमाणे कामकाज चालते, त्याचप्रमाणे येथील सुवर्णसौधात कामकाज चालवण्यास कोणतीही अडचण नाही. येथील नागरिक येऊन आपल्या समस्या मांडू शकतात आणि तोडगा काढू शकतात. काही विभाग आणि काही अधिकाऱ्यांची येथे स्थलांतरणे करणे आवश्यक आहे. वर्षातून एकदा रंग देऊन, दुरुस्ती करून, सदस्यांना बोलावून अधिवेशन घेतल्याने या भागातील समस्यांवर तोडगा निघणार नाही, अशी प्रतिक्रिया एस. एल. भोजेगौडा यांनी व्यक्त केली.

पुढे ते म्हणाले, राज्य सरकारमध्ये जनतेचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीसाठी भरपाई देण्याची शक्ती आणि योग्यता नाही काय? प्रत्येक गोष्टीसाठी केंद्राकडे बोट दाखवले जाते. केंद्र सरकारचा आदेश मिळेपर्यंत तुम्ही शांत का बसता? आधीच मदतीचा हात का मागितला नाही? काळमर्यादेत समस्यांवर तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने आपल्या जबाबदारीतून पळ काढणे शक्य नाही. जबाबदारीच्या गोष्टी सोडून द्या, असा सल्ला एस. एल. भोजेगौडा यांनी राज्य सरकारला दिला.

Tags: