बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या ‘महामेळाव्या’वर कर्नाटक सरकारने बंदी घातल्यामुळे, महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे शिवसैनिक कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहन मंडळाच्या बस रोखून संताप व्यक्त केला.


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यावर बेळगावमध्ये बंदी घातल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी बसला ‘जय महाराष्ट्र’चे पोस्टर चिकटवले. पुण्यातून हलियाळ च्या दिशेने निघालेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसला कोल्हापूर बसस्थानकात शिवसेनेच्या उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी अडवले. बसच्या दर्शनी भागावर आणि बाजूंना ‘जय महाराष्ट्र’चे स्टिकर्स आणि पोस्टर्स चिकटवून त्यांनी घोषणाबाजी करत आपला असंतोष व्यक्त केला. बेळगाव अधिवेशनाच्या दरम्यान म. ए. समितीने आयोजित केलेल्या सभेला पोलिसांनी परवानगी न दिल्याने संतप्त शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला.


Recent Comments