राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीबद्दल कोणतीही चर्चा झाली नाही, असे विजापूर जिल्ह्याचे पालकमंत्री एम.बी. पाटील यांनी स्पष्ट केले.

विजापूर शहरात माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “आमच्या पक्षात हायकमांड सर्वोच्च आहे. पद आणि आमचा जीवही आमच्या वडिलांची संपत्ती नाही,” असे मार्मिक विधान त्यांनी केले. नॅशनल हेराल्ड प्रकरणात डी.के. बंधूंना मिळालेल्या नोटीससंदर्भात प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, यावर डी.के. शिवकुमार स्वतः बोलतील आणि आवश्यक कागदपत्रेही सादर करतील.
राज्यातील भाजप पक्ष आता शिल्लक राहिलेला नाही, तो छिन्नविच्छिन्न झाला आहे. त्यांनी आधी आपले घर सांभाळावे, असा टोला एम.बी. पाटील यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, “आर. अशोक यांनी विरोधी पक्षनेतेपदावरून बाजूला व्हावे आणि दरोडेखोर जनार्दन रेड्डी यांना विरोधी पक्षनेते करावे. भाजपच्या लोकांनी दरोडेखोर जनार्दन रेड्डी यांना विरोधी पक्षनेता करावे,” अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीका केली.


Recent Comments