निपाणीत मध्यरात्री चोरी करण्यासाठी आलेल्या मास्कधारी दरोडेखोरांच्या टोळीने पोलीस घटनास्थळी येताच त्यांच्यावर धारदार शस्त्रे उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तेथून पळ काढला.

या घटनेमुळे निपाणी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचे हे कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मध्यरात्री कुलूप लावलेले घर फोडण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव फसला. लोकांनी चोरट्यांच्या टोळीची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र यावेळी दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी थेट पोलिसांवरच धारदार शस्त्रे उगारत तिथून पळ काढला.
चोरट्यांच्या या कृत्याचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेमुळे निपाणी शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडण्यासाठी जाळे पसरले आहे.


Recent Comments