Bagalkot

यात्रेत मुलांचा धोकादायक खेळ; अग्निकुंडात पायपीट

Share

बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील चोळचगुड्ड गावात वीरभद्रेश्वर देवाची यात्रा सुरू असताना, काही मुलांनी निखाऱ्याच्या राशीत धोकादायक खेळ खेळायला सुरुवात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंदिराच्या रथोत्सवानंतर भक्तांकडून अग्निकुंडातून चालण्याचा विधी पार पाडला जातो. मात्र, हा विधी पूर्ण झाल्यानंतर काही मुले एकमेकांशी स्पर्धा करत अग्निकुंडात खेळ करत असताना दिसून आली. यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. विधी संपल्यानंतरही मुलांनी अशा प्रकारे खेळणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत धोकादायक असून भविष्यात होणाऱ्या कार्तिकोत्सव आणि अग्नि महोत्सवांमध्ये जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Tags: