“मी आणि सतीश जारकीहोळी मंत्रिमंडळातील सहकारी आहोत. तुम्ही आम्हाला शत्रूंसारखे का मानत आहात?” असा प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी माध्यमांना विचारला.

आज बंगळूर येथे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या भेटीबद्दल माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “मी आणि सतीश जारकीहोळी मंत्रिमंडळाचे सहकारी आहोत. दुपारी आम्ही कॅबिनेटमध्ये असतो आणि संध्याकाळी जेवण किंवा चहासाठी एकत्र येतो. तुम्ही आम्हाला शत्रूंसारखे का मानत आहात?” असा मिश्किल टोला त्यांनी लगावला.
डी.के. शिवकुमार पुढे म्हणाले की, “आमच्या सरकारने सर्व उद्योजकांना सन्मान दिला पाहिजे. सर्व कामे आणि फाईल्सची लवकर विल्हेवाट व्हावी, या उद्देशाने उद्योगमंत्री एम.बी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली औद्योगिक विकासाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले आहे.”
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी उपलोकायुक्तांनी ‘६३ टक्के’ असा उल्लेख केला असल्याच्या विधानावर त्यांना प्रश्न विचारला असता, डी.के. शिवकुमार म्हणाले, “अशोक कोणत्या काळातला अहवाल सांगत आहेत हे मला माहीत नाही. त्यांनी प्रथम तो अहवाल तपासावा.” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.


Recent Comments