बंगळूरमधील विधानसौधच्या धर्तीवर बेळगाव मधील सुवर्णसौधासमोरही भुवनेश्वरी देवीची मूर्ती उभारली जावी, अशी मागणी कन्नड समर्थक संघटनांनी केली आहे.

आज बेळगाव येथील राणी चन्नम्मा चौकात ‘सर्वोदय स्वयंसेवा संघ’ आणि कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी आंदोलन केले.
याविषयी ‘इन न्यूज’शी बोलताना श्रीनिवास ताळुकर म्हणाले की, बंगळूरमधील विधानसौधच्या धर्तीवर मुख्यमंत्र्यांनी बेळगावात ८ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सुवर्णसौधासमोर १०८ फूट उंच भव्य कांस्य मूर्तीचे निर्माण व्हावे आणि त्याचे भूमिपूजन करावे.” अशी मागणी त्यांनी केली. जर मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केले नाही, तर बेळगावमधील सर्व कन्नड संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल. भुवनेश्वरी देवीच्या मूर्ती उभारणीसाठी घरोघरी निधी गोळा करू आणि स्वतः ती मूर्ती उभी केली जाईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी कन्नड समर्थक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.


Recent Comments