Uncategorized

कृषी विद्यापीठांनी आपले शोध शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावेत: मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

कृषी विद्यापीठांनी लावलेले शोध आणि उत्पादने जेव्हा प्रयोगशाळेतून थेट शेतापर्यंत पोहोचतात, तेव्हाच त्या संशोधनाचा उद्देश सफल होतो, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले.

आज मंड्या जिल्ह्यातील कृषी विज्ञान विद्यापीठात, कर्नाटक सरकारचे कृषी, फलोत्पादन, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय सेवा, जलसंधारण विकास, रेशीम, वन, मत्स्यव्यवसाय, ग्रामीण विकास आणि पंचायत राज, महिला व बालविकास विभाग आणि नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कृषी मेळा २०२५’ कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मंड्या येथे ५ जिल्ह्यांसाठी स्थापन झालेल्या कृषी विद्यापीठाने आपल्या शोधांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, भारत हा कृषीप्रधान देश असून, मी स्वतः ४५ वर्षांपासून राजकारणात सक्रिय असलो तरी शेतकरी कुटुंबातून आलो आहे. शेतकऱ्यांनी शेतीला फायदेशीर बनवण्यासाठी उपउत्पादनांवर भर द्यावा. तसेच, मजुरांची कमतरता लक्षात घेऊन यंत्रसामग्रीचा वापर केल्यास वेळ आणि खर्चात बचत होते. सध्या शिक्षित तरुण कृषी क्षेत्रात येत असल्यामुळे अधिक उत्पादन घेत आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मंड्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषीमंत्री चेलुवराय स्वामी, आमदार दर्शन पुट्टण्णय्या, कर्नाटक पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रस्वामी, म्हैसूर विद्युत प्रसारण निगमचे अध्यक्ष रमेश, मांड्याचे आमदार रविकुमार यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: