BENGALURU

महिलांनी वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

सरकारी प्रशासकीय यंत्रणेत मोठे योगदान देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून, १३ सप्टेंबर हा दिवस ‘महिला कर्मचारी दिन’ म्हणून घोषित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले.

अखिल कर्नाटक राज्य सरकारी महिला कर्मचारी संघटना, बंगळूर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी यंत्रणेत पुरुषांच्या बरोबरीने योगदान देणाऱ्या महिलांना समान मानण्यासाठी सरकार लिंग -भेदभाव संपवण्यास कटिबद्ध आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महिलांना वैचारिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचे आणि मुलांना अंधश्रद्धा व जातीयता यांपासून दूर ठेवून धर्मनिरपेक्ष समाज घडवण्याचे आवाहन केले. महिलांनी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ व्हावे या उद्देशाने ‘शक्ती’ योजनेंतर्गत ३.५ कोटी महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जात आहे, तसेच सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी सांगितले.

Tags: