बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सरस्वती नगर, लक्ष्मी टेकडी, फ्रीडम फायटर्स कॉलनी आणि शिवनेरी कॉलनी येथील रस्ते बांधकाम कामांना युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत भूमिपूजन करून सुरुवात केली.


बेळगाव शहराच्या विविध भागांतील महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना युवा काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते आज औपचारिक सुरुवात करण्यात आली. या रस्त्यांच्या कामांसाठी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विशेष लक्ष घालून सुमारे एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करवून घेतला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर लगेच कामांना सुरुवात करण्यात आली असून, रस्ते विकासाची ही कामे विहित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मृणाल हेब्बाळकर यांनी यावेळी कंत्राटदारांना दिले.

यावेळी मोहन सांबरेकर, अनिल लोबो फ्रान्सिस, सहरा बानू, काशीनाथ सांबरेकर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments