हुक्केरी येथे अधिवक्ता दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि पोलीस अपील तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष एन.के. सुदिंद्रराव यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून करण्यात आले.


याप्रसंगी व्यासपीठावर निवृत्त न्यायाधीश व्ही.व्ही. मल्लापूरे, एम.एम. पाटील, के.एम. चूरीखान, पी.एस. बाळीकाय आणि हुक्केरीचे वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश राजण्णा संकण्णवर, आदित्य कलाल, जी.जी. बादामी उपस्थित होते. अधिवक्ता संघाचे अध्यक्ष काडप्पा कुरबेटा आणि सदस्यांनी मान्यवरांचा सत्कार करून त्यांना सन्मानित केले. तत्पूर्वी, हुक्केरी शहरात आलेल्या मान्यवरांना वाद्यवृंदाच्या गजरात व्यासपीठावर आणण्यात आले.
माध्यमांशी बोलताना पोलीस अपील तक्रार प्राधिकरणाचे अध्यक्ष एन.के. सुदिंद्रराव म्हणाले, “अधिवक्ता व्यवसाय हा पवित्र आहे. वकिलांनी सातत्याने अभ्यास करून, संविधानाचे आणि कायद्याच्या पुस्तकांचे वाचन करून आपल्या व्यवसायात यश मिळवावे. संविधानाचा आणि अधिवक्ता दिनाचा अर्थपूर्ण सोहळा आज हुक्केरी शहरात साजरा करण्यात आला आहे.”
सायंकाळी कोर्ट परिसरात आयोजित केलेल्या मनोरंजन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना अधिवक्ता संघाचे अध्यक्ष के.बी. कुरबेटा म्हणाले, राज्यात विविध दिन साजरे केले जातात; पण सततच्या अभ्यासातून न्याय मिळवून देणाऱ्या वकिलांचा दिन आज हुक्केरीच्या वकिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. लोकसाहित्य आणि मनोरंजन कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व अधिवक्ता बांधवांचे अभिनंदन केले.
यावेळी बेळगाव सहकारी संस्थांच्या संयुक्त संचालिका विद्या होनशेट्टी, राज्य अधिवक्ता संघाचे सचिव बसवराज कोरीशेट्टी, हुक्केरी अधिवक्ता संघाचे उपाध्यक्ष बी.एम. जिनराळी, सचिव एस.जी. नदाफ, व्ही.एल. गस्ती, ए.ए. बागेवाडी, अनिता कुलकर्णी, के.पी. शिरगावकर, शिवलींग तेली, आशा सिंगाडी तसेच हुक्केरी, संकेश्वर येथील अधिवक्ता आणि अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments