Belagavi

हनुमान नगर व जाधव नगरात महापौरांनी केली पाहणी

Share

बेळगावचे महापौर मंगेश पवार यांनी आज हनुमान नगर आणि जाधव नगर परिसरांना भेट देऊन, तेथील स्वच्छता कार्याची पाहणी केली.

आज सकाळी, महापौर मंगेश पवार यांनी नगरसेवक संदीप जिरग्याळ आणि वीणा विजापुरे यांच्यासह आरोग्य निरीक्षक आणि संबंधित कर्मचाऱ्यांसोबत हनुमान नगर आणि जाधव नगर परिसरात भेट दिली. यावेळी, स्थानिक स्वच्छता कार्याची बारकाईने पाहणी करण्यात आली. परिसरात समाधानकारक स्वच्छता राखली जावी आणि आरोग्य व्यवस्थापन योग्य प्रकारे केले जावे, यासाठी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.

Tags: