किणये गावात निर्माणाधीन असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इमारतीच्या कॉलम पूजनाचा कार्यक्रम युवा काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पाडला.

सुमारे ६५ लाख रुपये खर्चून हे मंदिर बांधले जात आहे. ग्रामस्थांचे सल्ले घेऊन, मंदिर अत्यंत सुंदर पद्धतीने बांधले जावे, अशा सूचना मृणाल हेब्बाळकर यांनी कंत्राटदारांना दिल्या.

यावेळी मारुती डुकरे, सुभाष डुकरे, कृष्णा पाटील, अजित डुकरे, रवी डुकरे, महादेव बिर्जे, देवेंद्र डुकरे, पुण्णप्पा दळवी, पुंडलिक दळवी, ग्रामपंचायत अध्यक्ष हेमंत पाटील, सदस्य वर्षा डुकरे, संतू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments