विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरात दीड वर्षाच्या मुलाच्या अपहरणाच्या प्रकरणाचा सुखद शेवट झाला आहे. अपहृत बाळ सुखरूपपणे पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परतले आहे.

चडचणच्या शिवाजी नगर परिसरात मोहम्मद माज चांदशेख हे बाळ आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरासमोर खेळत होते, त्यावेळी एका अज्ञात महिलेने बाळाला उचलून नेले होते. घटनेनंतर भयभीत झालेल्या बाळाच्या पालकांनी तात्काळ चडचण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पालकांकडून माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ पथके तयार करून बाळाचा शोध सुरू केला.
तीव्र शोधानंतर चडचण येथील संगमेश्वर मंदिराच्या परिसरात महिलेने बाळाला सोडून दिल्याची माहिती मिळाली. तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी बाळाला सुखरूप ताब्यात घेतले. बाळ पूर्णपणे निरोगी असून, त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. चडचण पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेचा आता सुखद शेवट झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाची भावना पसरली आहे.


Recent Comments