बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील माविनकट्टी गावात होणाऱ्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गावात सुमारे ३ कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांना विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी शुभारंभ केला.

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नांतून मंजूर झालेल्या निधीतून सिमेंट रस्ते बांधणे, गटारांची दुरुस्ती करणे आणि इतर विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. “यात्रा सुरळीत पार पडावी आणि व्यवस्थेत कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्व विभागांना निर्देश दिले आहेत,” अशी माहिती चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.

यावेळी उलवप्पा मल्लण्णवर, चन्नप्पा हिरेहूळी, नागराज हिरेहोळी, ईरय्या हिरेमठ, युवक काँग्रेसचे नेते मृणाल हेब्बाळकर, बसवन्नी मल्लण्णवर, शंकर मल्लण्णवर, अडिवेप्या पाटील, चंद्रप्पा मल्लण्णवर, नागप्पा इटगी, बसनगौडा पाटील, नागेश देसाई, सिद्धनगौडा पाटील, निलेश चंदगडकर आदी मान्यवर उपस्थित होते.



Recent Comments