बेळगाव जिल्हा आयुर्वेदिक (आयुष) रुग्णालयाच्या वतीने २६ नोव्हेंबर ‘संविधान दिना’च्या निमित्ताने आज (गुरुवारी) सकाळी रुग्णालयाच्या समोर विशेष शपथग्रहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाप्रती निष्ठा राखण्याची आणि त्याचे पावित्र्य जपण्याची शपथ घेतली. देशाच्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला.यावेळी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. श्रीकांत सोनूदोलि, डॉ. चंद्रशेखर सिद्धापूर, डॉ. रूपा श्री. यांच्यासह इतर अधिकारी, रुग्णालयातील सहकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून संविधान दिनाच्या महत्त्वाचे स्मरण केले.


Recent Comments