धारवाड कर्नाटक विद्यापीठाच्या एका प्राध्यापकांना आज पहाटे लोकायुक्त पोलिसांनी मोठा धक्का दिला आहे. प्राध्यापकांचे निवासस्थान आणि कर्नाटक विद्यापीठातील त्यांच्या विभाग कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी झडती सुरू केली आहे.

सुभाषचंद्र नाटीकर यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्या विभाग कार्यालयावर मंगळवारी पहाटे लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला आहे. नाटीकर हे कर्नाटक विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक तसेच विद्यापीठातील ‘आंबेडकर स्टडीज’चे समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. धारवाडमधील शेट्टर कॉलनी येथे नाटीकर यांचे घर आहे, तसेच त्यांचे कोप्पळ जिल्ह्यातील ताळीकोटे येथेही स्वतःचे घर आहे. या दोन्ही ठिकाणी लोकायुक्त पोलिसांनी एकाच वेळी धाडी टाकल्या आहेत. यासोबतच कर्नाटक विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागावर आणि ‘आंबेडकर स्टडीज’ विभागाच्या कार्यालयावरही लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून तपासणी सुरू केली आहे.


Recent Comments