Dharwad

धारवाड जिल्ह्यात ‘कन्हेरी श्रीं’च्या प्रवेशाला उच्च न्यायालयाची परवानगी

Share

धारवाड जिल्ह्यामध्ये कण्हेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या प्रवेशावर जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेला निर्बंध धारवाड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हटवला आहे.

गेल्या ५ नोव्हेंबर रोजी अण्णीगेरी तालुक्यात कण्हेरी श्रींना एका कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, कण्हेरी श्रींनी लिंगायत समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेशाची परवानगी देऊ नये, अशी मागणी लिंगायत संघटनांनी धारवाड जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कण्हेरी श्रींच्या धारवाड जिल्हा प्रवेशावर निर्बंध घालण्याचा आदेश जारी केला होता.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाला श्रींनी धारवाड उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आज या याचिकेवर सुनावणी करताना धारवाड उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेला प्रवेश निर्बंध हटवण्याचा आदेश दिला. परिणामी, कण्हेरी श्रींना आता धारवाड जिल्ह्यात प्रवेश करण्याची परवानगी मिळाली आहे.

Tags: