रक्तदान हे श्रेष्ठ दानांपैकी एक आहे. प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा ते तीन वेळा रक्तदान करायला हवे. हे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. सामाजिक सेवांमध्ये रक्तदान अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत आरएल विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. ज्योती कवळेकर यांनी व्यक्त केले.

त्या लिंगराज महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिराला हिरवी झेंडी दाखवून बोलत होत्या. एनसीसी दिनानिमित्त २६ आणि २५ कर्नाटक एनसीसी बटालियन, लिंगराज महाविद्यालय, आरएल विज्ञान महाविद्यालय यांचे आर्मी व एअर विंग एनसीसी विभाग, रेड क्रॉस, एनएसएस युनिट्स आणि केएलई डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व संशोधन केंद्राच्या रक्तपेढीच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
युवा पिढीमध्ये रक्तदानाबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. रक्तदान केल्यास आपण एका रुग्णाचा जीव वाचवू शकतो. तरुणांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे. हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
लिंगराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.एस. मेलिनमनी यांनी यावेळी मार्गदर्शन केले. “एनसीसी कॅडेट्समध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवण्यासाठी हे शिबिर आयोजित केले आहे. युवक हे आपल्या देशाचा कणा आहेत आणि त्यांनी सामाजिक सेवांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा,” असे त्यांनी म्हटले.
यावेळी केएलई रुग्णालयाच्या रक्तपेढीचे डॉ. विठ्ठल माने, डॉ. गंगाधर भगवतनवर, एनसीसी अधिकारी मेजर डॉ. महेश गुरनगौडर, कॅप्टन एच.एन. चुळकी, कॅप्टन डॉ. शिवानंद बुलबुले, एच.एन. बन्नूर, एनएसएस युनिटचे प्रशांत कोंनूर, रेड क्रॉस अधिकारी प्रा. सुमित मूडलगी उपस्थित होते.


Recent Comments