बेळगाव आणि परिसरामध्ये गेल्या ५०० हून अधिक रविवारपासून सातत्याने वृक्षारोपण कार्यात सक्रिय असलेल्या ‘ग्रीन सेव्हियर्स’ या संघाने आता ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

या संघाने महालेनाहट्टी गावात पहिल्या कृषी वन प्लॉटच्या स्थापनेला सुरुवात केली आहे. बेळगावमधील हिंडाल्को कंपनीने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रायोजकत्व स्वीकारले आहे. या योजनेंतर्गत, इच्छुक शेतकऱ्यांना फळझाडे, भाज्या आणि फुले यांचा वापर करून पूर्णपणे रासायनिकमुक्त शेती करण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रायोजकत्व दिले जात आहे. याप्रसंगी समाजसेवक आणि राज्योत्सव पुरस्कार विजेते शिवाजीण्णा कगनिकर, हिंडाल्कोचे प्रतिनिधी दिनेश नाईक, ज्योतीसिंग आणि संजय मोल, तसेच प्रगतिशील शेतकरी गोपीचंद नरेगावी उपस्थित होते.
या कृषी वन प्लॉटमधून मिळणारी सर्व उत्पादने बेळगाव शहरातील नागरिकांना कोणत्याही नफ्याशिवाय (Non-Profit Basis) विकण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शहरातील कुटुंबांना बाजारातील नेहमीच्या किमतीत रासायनिकमुक्त आणि ताजी उत्पादने मिळणे शक्य होणार आहे. अशा लोकहिताच्या योजनांना प्रायोजित करण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांनी तसेच या कार्यक्रमाचा भाग होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी ‘ग्रीन सेव्हियर्स असोसिएशन’चे संस्थापक समीर माजली यांच्याशी ९६११३१३९१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Recent Comments