म्हैसूर शहरात यशस्वीरीत्या पार पडलेल्या वस्तू प्रदर्शनाचे आयोजन आता उत्तर कर्नाटकातील बेळगावमध्ये करण्यात आले आहे.

बेळगाव येथील सीपीएड मैदानावर हे प्रदर्शन ३० नोव्हेंबरपासून ते १ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती राज्य वस्तू प्रदर्शन प्राधिकरणाचे अध्यक्ष आयुब खान यांनी दिली. या प्रदर्शनाच्या माध्यमातून बेळगावसह परिसरातील नागरिकांना विविध शासकीय योजना आणि उत्पादनांची माहिती एकाच छताखाली मिळणार आहे.
सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कर्नाटक वस्तू प्रदर्शन प्राधिकरणाकडून म्हैसूर दसऱ्यामध्ये नियमितपणे वस्तू प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. बेळगावात होणाऱ्या या वस्तू प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते होणार आहे, असे त्यांनी म्हटले.
सहकारी दूध संघ, कृषी, फलोत्पादन , पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभाग, लिडकर चर्मोद्योग यासह विविध सरकारी मालकीचे स्टॉल्स या वस्तू प्रदर्शनात सहभागी होणार आहेत.
यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments