Belagavi

‘उत्तर कर्नाटक’च्या मागणीला नाही तर बेळगाव जिल्हा विभाजनाला पाठिंबा : आम. रमेश जारकीहोळी

Share

उत्तर कर्नाटकच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला आमचा पूर्णपणे विरोध असून, केवळ अखंड कर्नाटकलाच आमचा पाठिंबा असेल, असे गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे.

आज बेळगावात पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपमध्ये कोणतेही बंड होणार नाही. आमच्या पक्षामध्ये आम्ही हाय कमांडच्या निर्णयाचे पालन करतो. याचवेळी त्यांनी आमदार राजू कागे यांच्या स्वतंत्र राज्याच्या मागणीला आपण सहमत नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, अखंड कर्नाटकलाच आमचा पाठिंबा आहे. केवळ मंत्रिपद किंवा महामंडळाची मागणी करण्यापुरते बोलू नका. बेळगाव विभाजनासंदर्भात गोकाकचाही जिल्हा म्हणून समावेश झाला पाहिजे. मागील वेळी सिद्धरामय्या मुख्यमंत्री असताना, मी मंत्री असताना ही मागणी अंतिम झाली होती; परंतु त्यावेळी ते शक्य झाले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Tags: