चिकोडी तालुक्यातील येडूर, येडूरवाडी, येडूरटेक आणि चंदूर या चार गावांतील नऊ तरुणांची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतचे माजी सदस्य लक्ष्माण शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली या सर्व तरुणांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

प्रसाद फुलारे, ओंकार हेद्दुरे, पंकज माने, संकेत भंडारे, रितेश उमराणे, सोपान धनगर, राकेश धनगर, संकेत शिंदे, आदर्श उगारे या नऊ तरुणांची भारतीय सैन्यात अग्निवीर म्हणून निवड झाल्याने हा सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवर रवींद्र बोरगावे यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, “येडूरसह आजूबाजूच्या परिसरातील इतके तरुण भारतीय सैन्यात निवडले जाणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सैन्यात निवड झालेल्या या तरुणांना सन्मानित करून प्रोत्साहन देणारे लक्ष्माण शिंगाडे यांचे कार्य प्रशंसनीय आहे.”
यावेळी विष्णू शिंगाडे, शिवू हंजी, अण्णासाहेब हंजी, पंचाक्षरी जडे, संतोष पाटील, रवींद्र बोरगावे, गुंडू फुलारे, पोपट करोशी, सुरेश कागवाडे, धनंजय जाधव, दादू नरवाडे, संतोष बेळवी, मल्लिकार्जुन मठपती, मंजुनाथ बेंडगे, बसवराज हुन्नूर, शितल बोरगावे, वृषभ पुजारी, संतोष टेंगुले, संतोष शिंगाडे, प्रवीण खडक यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments