बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते रामतीर्थनगर येथील श्री कार्यसिद्धी अंजनेय स्वामी मंदिरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.


विकासाचे ध्येय ठेवून जनतेची सेवा करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मतदारसंघातील मूलभूत सुविधांच्या कमतरता दूर करण्यासाठी आपण प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विकासासाठी सर्वांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण मतदारसंघात मूलभूत सोयीसुविधांची योग्य अंमलबजावणी करणे हे माझे प्रथम प्राधान्य आहे, असे त्यांनी सांगितले आणि सत्कार केल्याबद्दल कार्यसिद्धी अंजनेय स्वामी मंदिर ट्रस्ट कमिटीचे आभार मानले.
मंदिर कमिटीचे अध्यक्ष सुरेश उरबिनट्टी यांनी स्वागतपर भाषण करताना मूलभूत सोयीसुविधांच्या अभावामुळे भाविकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधले. ही अडचण दूर करण्यासाठी आवश्यक असलेले सभागृह बांधण्यास तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी आमदारांना केली आणि विकासकामांचे निवेदन सादर केले.
यावेळी मनपा सदस्य हनुमंत कोंगाळी, युवा नेते अमान सेठ, माजी महापौर एन. बी. निर्वाणी, ताहीर सय्यद, प्रवीण कोरिशेट्टी, बसवराज शिरगावी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच, बुडाचे अभियंता मंजुश्री बडिगेर, हेस्कॉमचे अभियंता अश्विनी शिंदे आणि कॉर्पोरेशनचे अभियंता अंकित, मंदिर कमिटीचे सदस्य तसेच महिला संघटनेच्या निर्मला उरबिनहट्टी, लता काजगार आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते..


Recent Comments