धारवाडमध्ये पोलिसांनी अमली पदार्थांच्या व्यसनींना पहाटेच धडक कारवाई करत ‘गरम’ केले आहे. एनडीपीएस प्रकरणात ज्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत, अशा अनेकांना धारवाडमधील तीन पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी बोलावून घेतले. या आरोपींनी अजूनही मादक पदार्थांचे सेवन करणे सोडले आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांची वैद्यकीय चाचणी करून त्यांना तंबी देण्यात आली आहे.

धारवाडच्या ‘डिमान्स’मध्ये पोलिसांनी अमली पदार्थांच्या व्यसनींनी कोणते मादक पदार्थ घेतले आहेत, याची तपासणी केली. धारवाडमधील अनेक व्यसनींना ‘डिमान्स’मध्ये आणण्यात आले होते. त्यांची तपासणी करण्यात आली आणि ज्यांनी ड्रग्जचे सेवन केले असल्याचे आढळले, त्यांना पोलिसांनी अमली व्यसनापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या. एसीपी प्रशांत सिद्धनगौडर यांच्या नेतृत्वाखाली तीन पोलीस ठाण्यांच्या पोलिसांनी ड्रग्ज व्यसनींना ‘डिमान्स’मध्ये आणून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर या व्यसनींविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करून त्यांना कडक इशारा देण्यात आला.


Recent Comments