बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित पोलीस वार्षिक क्रीडा संमेलन-२०२५ ला बेळगाव येथील जिल्हा पोलीस कवायत मैदानावर शानदार सुरुवात झाली.


तणावपूर्ण व्यावसायिक जीवनातून पोलिसांना उत्साह आणि खेळाची वृत्ती मिळावी, या उद्देशाने या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.. बेळगावचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक यांच्या हस्ते क्रीडा संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यानंतर विविध तुकड्यांचे आकर्षक पथसंचालन झाले. यावेळी बोलताना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश मंजुनाथ नाईक बोलताना म्हणाले, क्रीडा भावना केवळ मैदानापुरती मर्यादित नसून ती व्यावसायिक जीवनाच्या यशासाठी आवश्यक आहे. तणावपूर्ण कामातून बाहेर पडून पोलीस आज क्रीडा स्पर्धेत भाग घेत आहेत. जीवनात पराजय स्वीकारण्याची आणि विजय साजरा करण्याची वृत्ती खेळातूनच मिळते, ज्यामुळे व्यावसायिक जीवनात सकारात्मकता येते,” असे मत न्यायाधीश नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त एन. व्ही. बरमनी, उपायुक्त निरंजन राजे अरस यांच्यासह इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments