Chikkodi

‘मंत्रीपद नको म्हणायला मी काही संन्यासी नाही’; आमदार लक्ष्मण सवदी

Share

आमदार लक्ष्मण सवदी यांनी “मंत्रीपद नको म्हणायला मी काही संन्यासी नाही,” असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. मात्र, त्यांनी मंत्रीपदाची कोणतीही अपेक्षा केली नसल्याचेही सांगितले.

अथणी येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, मला मंत्रीपद द्यायचे की नाही, हा निर्णय पूर्णपणे वरीष्ठ नेत्यांवर अवलंबून आहे. मी संन्यासी नसून राजकारणी आहे, त्यामुळे मंत्रीपद नको म्हणणार नाही. मंत्रिमंडळ विस्तार कधी करायचा, याचा निर्णय हायकमांड आणि मुख्यमंत्री एकत्र चर्चा करून घेतील. सवदींच्या अंदाजानुसार, सध्या नवीन मंत्रिमंडळ रचनेबद्दल कोणतीही हालचाल नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.

Tags: