आधुनिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन ‘जय भारत फाउंडेशन’ बेळगावतर्फे येळ्ळूर येथील सरकारी वरिष्ठ प्राथमिक मराठी मॉडेल शाळेला १० संगणक भेट म्हणून देण्यात आले आहेत.


डिजिटल युगात विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञान देण्यासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य सतीश बाळकृष्ण पाटील आणि आनंदवाडी शहापूरचे महेश मल्लप्पा चौगुले यांनी शाळेला ही आधुनिक शैक्षणिक साधने मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान एस.डी.एम.सी. चे उपाध्यक्ष ज्योतीबा उडकेकर यांनी भूषवले. यावेळी ‘जय भारत फाउंडेशन’चे बसवनागौडा पाटील यांचा शाळेतर्फे शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच, शाळेच्या २००४-०५ च्या सातवीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेला ‘ड्रॉ कपाट’ भेट म्हणून दिले. माजी विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या या भेटीमुळे शिक्षक-विद्यार्थी आणि शाळेतील भावनिक बंध अधिक दृढ झाले आहेत.


Recent Comments