विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा सदुपयोग करून वाचन करावे आणि आपले ध्येय गाठावे, तसेच आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन महापौर मंगेश पवार यांनी केले.


बेळगाव येथील शेषाद्री अय्यर स्मारक भवनात कर्नाटक शासनाच्या सार्वजनिक ग्रंथालय विभाग, जिल्हा आणि शहर मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वतीने ‘राष्ट्रीय ग्रंथालय सप्ताह २०२५’ समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. महापौर मंगेश पवार यांनी या समारंभाचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालयांचा पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. कारण प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांनी आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल अनेक महत्त्वाची स्वप्ने पाहिलेली असतात. ती स्वप्ने साकार करण्यासाठी सर्व मुलांनी श्रद्धेने आणि चांगला अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले.

उपमहापौर वाणी जोशी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. प्रमुख अतिथी म्हणून रेखा हूगार, राजू भातकांडे, सुरेश वैद्य, डॉ. एच. आय. तिम्मापूर आणि रामय्या उपस्थित होते.
याप्रसंगी कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव तसेच उत्कृष्ट वाचकांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा/शहर मध्यवर्ती ग्रंथालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments