Belagavi

सरकारी बसच्या दरवाज्याला लटकून जीवघेणा प्रवास!

Share

सरकारी बसमध्ये प्रवासी चक्क दरवाजाला लटकून प्रवास करत असतानाही, बसचे चालक आणि वाहक यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याची गंभीर घटना बेळगावात उघडकीस आली आहे.

बेळगाव येथील सुवर्णसौधजवळ राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका बसचा हा प्रसंग आहे. कर्नाटक रस्ते परिवहन महामंडळाच्या हालगा गावासाठी धावणाऱ्या या बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. अतिरिक्त गर्दीमुळे अनेक तरुण बसच्या उघड्या दरवाज्याला लटकून धोकादायक प्रवास करताना दिसून आले. मात्र, बसच्या चालक अथवा वाहकानेही या गंभीर प्रकाराची साधी दखल घेतली नाही. अशा प्रकारे केलेला प्रवास हा प्रवाशांच्या जीवितास अत्यंत धोकादायक ठरू शकतो. कोणतीही दुर्घटना घडल्यास या प्रवाशांच्या जीविताची हानी होण्याची शक्यता आहे. या चालकाच्या आणि वाहकाच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे, तसेच प्रवाशांच्या बेपर्वाईमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags: