चिकोडी तालुक्यातील येडूरवाडी गावात मोठी मगर आढळल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. शहापूर रस्त्यावर ७ ते ८ फूट लांबीची ही मगर फिरत असताना ग्रामस्थांनी त्वरित पुढाकार घेत तिला पकडले.

काल सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शहापूर रस्त्यावर सुमारे ७ ते ८ फूट लांबीची एक मगर फिरत होती. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे लक्षात येताच, ग्रामस्थांनी दोरी आणि काठीच्या साहाय्याने या मगरीला पकडले आणि एका खांबाला बांधून वन विभागाला माहिती दिली.
यानंतर, वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मगरीला ताब्यात घेऊन सुरक्षित ठिकाणी रवाना केले. शहापूर रस्त्याच्या सखल भागांत मोठ्या प्रमाणावर मगरींचा वावर आहे. वन विभागाने पुढाकार घेऊन त्या सर्व मगरींना पकडावे आणि त्यांना सुरक्षित स्थळी हलवून ग्रामस्थांच्या मनातील भीती दूर करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.


Recent Comments